एप्रिल महिन्यात दोन जणांचा बळी घेवून फरारी झालेल्या टँकरचालकाला अखेर अटक
एप्रिल महिन्याच्या अखेरीस आसगे दाभोळे राज्य मार्गावर टँकरने ठोकल्याने लांजा गोविळ जाधववाडी येथील श्याम अर्जुन जाधव (५०) आणि प्रकाश सावजी जाधव (५५) या दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पसार असलेला सोळा टायर ट्रक चालक रूपेश सिद्धू वाघमारे (३५, रा. येळापूर, ता. शिराळा, जि. सांगली) याला अपघातातील सोळा टायर ट्रकसह पकडण्याात पोलिसांना यश आले आहे. ३१ मे रोजी त्याला सांगली येथून अटक करून लांजा दिवाणी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याची उकल करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, २८ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता साखरपुड्याच्या कार्यक्रमास जात असताना आसगे येथे एका वळणावर लांजा-कोर्ले तिठा येथून दाभोळे येथे जाणार्या एका वाहनाने जाधव बंधुंच्या दुचाकीला धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. www.konkantoday.com