राजापूर शहरातील पेट्रोलपंपादरम्याने महामार्गावर दारूच्या बाटल्या फोडून टाकल्याने काचांचे साम्राज्य


राजापूर शहरातील पेट्रोलपंपादरम्यान असलेल्या मुंबई- गोवा महामार्गाच्या उड्डाणपुलाची एक बाजू बंद असल्याने हा भाग मद्यपींचा अड्डा बनला आहे. या पुलावर जिकडे-तिकडे मद्यांच्या बाटल्या पडलेल्या दिसून येत असून तळीरामांना रस्त्यातच दारूच्या बाटल्या फोडून टाकल्याने मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍या नागरिकांसह पादचार्‍यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेली दीड-दोन वर्षे सातत्याने हे प्रकार सुरू असताना पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्ययात येत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button