महामार्गाच्या कंत्राटदार व अधिकार्यांच्या चुकीमुळे अपघातात एकाचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक, नुकसान भरपाईची मागणी
मुंबई-गोवा महामार्गाच्या खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी गर्डरवर आदळून शनिवारी येथील स्थानिक तरूणाचा जागीच मृत्यू झााला. या अपघातास राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, ठेकेदार कारणीभूत असून याप्र्रश्नी सोमवारी ग्रामस्थांनी महामार्गच्या कार्यालयावर धडक दिली. मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्या, अन्यथा एकाही अधिकारी, ठेकेदाराला महामार्गावरून फिरू देणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी अधिकार्यांना धारेवर धरले.
शनिवारी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास खेरशेत-पुनर्वसन येथील रहिवासी अनिल घाडगे हा आरवलीहून खेरशेत येथे घरी येत होता. मुंबई-गोवा महामार्गावरून दुचाकीने प्रवास करतेवेळी तो खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी गर्डर ठिकाणी जोरात आदळला. त्याठिकाणी अंधार शिवाय पाऊसही होता. या अपघातात अनिल गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातास राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, ठेकेदार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत याचा जाब विचारण्यासाठी खेरशेत, आसुर्डे, कुटरे, आगवे गावातील ग्रामस्थांनी महामार्गाच्या कार्यालयासमोर धडक दिली. www.konkantoday.com