बीटकॉईन व क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून ६६ हजाराची ऑफलाईन फसवणूक
देवघर गुहागर येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी शाम पेवेकर यांची बीटकॉईन व क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून ६६ हजार रुपयांची त्यांची फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत गुहागर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जितीन थॉमस व रॅन डॅनी या नावाच्या अज्ञात इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील जतिनी थॉमस व रॅन डॅनी यांनी संगणकीय साधनाचा वापर करून इंटरनेट जनरेटर क्रमांकाद्वारे फिर्यादी पेवेकर यांना वारंवार संपर्क केला. त्यावेळी आपण ब्रोकर असल्याचे भासवून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस बीटकॉन व क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी वरील दोघांच्या खात्यात आपल्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ३ वेळा व्यवहार करून ६६ हजार ३१७ रुपये फिरोज खान नामक व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केले. दरम्याने आपली फसवणूक झाल्याचे पेवेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी गुहागर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे. www.konkantoday.com