गणपतीपुळे समुद्राला उधाण, पर्यटकांनी समुद्रात न उतरण्याचे आवाहन
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्राने रूद्रावतार धारण केला असून मोठे उधाण आले आहे. जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने भाविक, पर्यटकांना समुद्रस्नानाला न जाण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. समुद्र किनारी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर लाटा जोराने आदळत आहेत. भाविक, पर्यटक तरीदेखील समुद्रास्नानाला जात आहेत. गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांनी ध्वनीक्षेपकाद्वारे समुद्रस्नानाला न जाण्याचे आवाहन केले आहे. तरीदेखील भाविक, पर्यटक ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून समुद्र स्नानाला जात आहेत. श्री देव गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांच्यामार्फत समुद्र स्नानाला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. गणपतीपुळे परिसरात सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. गणपतीपुळे समुद्रात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत, संस्थांचे कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. www.konkantoday.com