
शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून लढवय्या राजांचा धगधगता इतिहास कायमस्वरूपी सर्वांसमोर राहील -पालकमंत्री रवींद्र वायकर
कसबा येथे शंभूराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याच्या माध्यमातून शंभूराजांचा धगधगता इतिहास कायमस्वरूपी सर्वान समोर राहील असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी केले.त्यांच्या हस्ते कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले या ठिकाणी आता अनेक पर्यटक भेट देतील त्यामुळे कसब्याच्या पर्यटन विकासालाही चालना मिळेल.या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, जी.प अध्यक्षा स्वरुपा साळवी,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अधीक्षक अभियंता जे डी कुलकर्णी, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक,वेदा फडके, प्रमोद पवार, संतोष थेराडे,रोहन बने, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक सुधीर भोसले आदी उपस्थित होते.कसबा येथे संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पुढाकार घेतला होता. पूर्णाकृती पुतळ्यासाठी आलेला वीस लाखांचा खर्च पालकमंत्र्यांनी स्वतः केला.याशिवाय या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असून त्याला जिल्हा नियोजन मंडळामार्फत ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.पावसानंतर सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.मुसळधार पावसातही या लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday