
रत्नागिरी विमानतळावरील प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उभारणीच्या कामाला गती
रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग उभारणे आवश्यक आहे. काम विमानतळ प्राधिकरणाने काढलेल्या निविदाप्रक्रियेद्वारे न्याती इंजिनअर्स अॅण्ड कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेडला (एनईसीपीएल) मिळाले आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उभारणीच्या कामाला गती येणार आहे.
मिरजोळे गावातील रत्नागिरी विमानतळ हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एमआयडीसी मालकीचे आहे. सध्या ते भारतीय तटरक्षक दलाकडे आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीद्वारे (एमएडीसी) ३२०० चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या परिसरात नवीन पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, लिंक टॅक्सी वे आणि दोन एटीआर-७२ प्रकारची विमाने उतरण्यासाठी सक्षम प्रणाली विकसित केली जात आहे. मार्च २०२४ मध्ये विविध बांधकामासाठी ५०.५२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत तसेच महाराष्ट्र एअर डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) ५४० दिवस (१. ४७ वर्षे) बांधकामासाठी मुदत दिली आहेत्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला सातजणांचा प्रतिसाद लाभला. त्यापैकी फुलारी रियल्डी, नेश ऑर्किटेक्स आणि एससीसी इन्फ्रास्ट्रक्चर या ३ कंपन्यांच्या सादर केलल्या निविदा तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्या. या प्रक्रियेत न्याती कंपनी पात्र ठरल्यामुळे रत्नागिरी विमानतळाचे पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामाला गती मिळणार आहे.
www.konkantoday.com