रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आता मिशन बांबू लागवड
फळबाग लागवडीतून आंबा, काजू लागवडीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेकर्यांना अनुदान प्राप्त करून दिले तर यावर्षी जिल्हा परिषदेने बांबू लागवडीचे मिशन हाती घेतले असून नुकतीच याची कार्यशाळाही दापोली येथे घेण्यात आली. जिल्ह्यात ४०० हेक्टर क्षेत्रावर बाबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
बांबू लागवडीतून शेतकर्यांना आता अर्थाजनाची सुवर्णसंधी या शिर्षकाखाली बांबू लागवड मिशन हाती घेण्यात आले आहे. बांबू हे आर्थिक उत्पन्न देणारे वनपीक आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांनी बांबू लागवड मिशन स्वरूपात लागवड करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील ४०० हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्याचे उद्दिष्ट असून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला १ हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
www.konkantoday.com