संतापलेल्या ग्रामस्थांसह भाजपचे रामपूर एसटी बस थांब्याजवळ सोमवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन
चिपळूण रामपूर- देवखेरकी- नारदखेरकी रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरून सतत अपघात घडत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांसह भाजपने रामपूर एसटी बस थांब्याजवळ सोमवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना घेराव घालत जाब विचारला. रास्ता रोको आंदोलनामुळे गुहागर मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सार्वजनिक बांधकामचे अभियंता एक वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी देवखेरकी रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे. सर्व आंदोलनकर्त्यांनी नारदखरकी पर्यंत चालत जाऊन रस्त्याची पाहणी करण्यास सांगितले. चार महिने पावसाळ्यात ३ ते ४ गावांनी दळणवळण कसे करायचे, अशा प्रश्नांचा भडिमार केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच या रस्त्याची तातडीने डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
www.konkantoday.com