गावखडी समुद्र किनार्यावरील पाण्यात पिवळा तवंग
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील समुद्रकिनारी पाण्यावर पिवळा तवंग दिसून आला आहे. मागील दोन दिवसांपासून पडणार्या पावसाचा हा परिणाम आहे की, यामध्ये अन्य काही कारण आहे का, याबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांच्या ही बाब निदर्शनास आली. सुमारे तीन ते चार मीटर पिवळा तवंग दिसत आहे. या बाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून त्याबाबत माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
www.konkantoday.com