कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या धावताहेत उशीरा
कोकण मार्गावरून धावणार्या ८ रेल्वेगाड्यांना विकेंडलाही अनेक गाड्या उशिरा लावत होत्या रविवारी कोच्युवेली-एलटीटी एक्सप्रेसच्या प्रवाशांची तब्बल ७ तास रखडपट्टी झाल्याने प्रवासी त्रासून गेले एलटीटी-थिविमसह एलटीटी-मडगाव ५ तास विलंबाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. अन्य ५ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागला. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
उन्हाळी सुट्टीचा हंगाम संपुष्टात आल्याने चाकरमानी परतीला निघाले आहेत. कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावत असून प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये एन्ट्री मिळवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तोबा गर्दीमुळे प्रवाशांना लटकंतीचा प्रवास करावा लागत असून इच्छितस्थळ गाठताना प्रवाशांची दमछाक होत आहे. विक्रमी गर्दीमुळे प्रवाशांचा रेटारेटीचा अन लोंबकळत प्रवास सुरू असतानाही चाकरमानी रेल्वेगाड्यांनाच सर्वाधिक पसंती देत आहेत. www.konkantoday.com