
मान्सून मंदावला, मागील काही दिवसांपासून राज्याला पावसानं दिली विश्रांती
मान्सून टर्फ’ रेखा सध्या उत्तरेकडे सरकली आहे. त्यामुळे मान्सून मंदावला असून मागील काही दिवसांपासून राज्याला पावसानं विश्रांती दिली आहे. पुढील १०दिवस ही परिस्थिती राहण्याची शक्यता असून ५ जुलै नंतर मान्सूनचे पुनरागमन होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान आसाम,बिहार आणि उत्तर-पूर्व भागात मात्र मुसळधार पावसाचा शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर, आता राज्यात मान्सून काहीसा मंदावला आहे.
www.konkantoday.com