रत्नागिरी लगत असणार्‍या ग्रामपंचायतीत उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांचे आदेश


रत्नागिरी लगत असणार्‍या ग्रामपंचायतीत रस्त्याकडेला जास्त कचर्‍याच्या दिसून येणार्‍या ढिगार्‍यांची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. त्या कचर्‍याचे व्यवस्थापन होण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावेत तसेच जागोजागी फलक लावून उघड्यावर कचरा टाकणार्‍या व्यक्तींची ओळख पटवून दंडात्मक कार्यवाही ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावी, अशा सक्त सूचना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिल्या आहेत.
शहरालगतच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ, व्यापारी यांचे गाव परिसरातील स्वच्छतेबाबत प्रबोधन करत घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहनही पूजार यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद रत्नागिरीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत ५ जून २०२४ रोजी मान्सूनपूर्व स्वच्छता श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये सार्वजनिक कचर्‍याचे ढिगारे असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व मंदिरे, शासकीय कार्यालये, नदी परिसर, बाजार परिसर अशा ठिकाणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता भारत श्रमदान मोहीम राबवण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे ग्रामपंचायतीत राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत स्वतः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार व जिल्हा परिषद रत्नागिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी सहभागी होवून मार्गदर्शन केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button