
पावसाच्या सरी कोसळत असतानाच देवरूखात डांबरीकरणाचे काम
देवरूख नगरीत पाऊस कोसळत असतानाही देवरूख-कांगणेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता टिकेल की नाही, अशी भीती स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. डांबरीकरण कामाकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
देवरूख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. देवरूख शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी नगर पंचायतीच्यावतीने पावले उचलली जात आहेत. टाकावू कचर्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. रस्त्यांना डांबरीकरणाचा साज देवून चकाचक केले जात आहे. गेले ४ दिवस देवरूखात पाऊस कोसळत आहे. यातच देवरूख कांगणेवाडी मार्गावर खड्डे भरणे यासह डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. www.konkantoday.com