
ठरलं! राहुल गांधी होणार लोकसभेतील विरोधी पक्ष नेते!! काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय
लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदावर राहुल गांधी यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आज कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देताना राहुल गांधी यांनी यावर आपण विचार करू असे म्हटले आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेस कार्यकारीणीने एकमताने राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आहे.
www.konkantoday.com