खेड तालुक्यातील विविध ठिकाणच्या अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी मनसेचे वनविभागाला निवेदन
खेड तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षतोड सुरू असुन ही अवैध वृक्षतोड तातडीने थांबविण्यात यावी, अन्यथा आंदोलनाद्वारे अधिकार्यांना वृक्षतोडीच्या ठिकाणी नेवून कारवाईस भाग पाडू, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी येथील वनविभागाचे वनाधिकारी सुरेश उपरे यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात अवैधपणे वृक्षतोड सुरू असल्याने जंगले भकास होत चालली आहेत. एकीकडे शासन वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संवर्धन करत असताना दुसरीकडे मात्र तालुक्यात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने पर्यावरणाचा र्हास होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीला लगाम घालण्यासाठी वनविभागाने लक्ष द्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
www.konkantoday.com