आता पावसाळ्यानिमित्त कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल


आता पावसाळ्यानिमित्त कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे नवीन वेळापत्रक कसे आहे ते जाणून घेऊयात…

कोकणामध्ये दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होत असते. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे नवीन वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे…

मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाड्यांचे नवे वेळापत्रक

कोकणकन्या एक्सप्रेस – मडगाववरुन सायंकाळी 6 वाजता सुटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5.40 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल.
वंदेभारत एक्सप्रेस – मडगाववरुन दुपारी 12.30 वाजता सुटेल आणि रात्री 10.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
जनशताब्दी एक्सप्रेस – मडगाववरून दुपारी 12 वाजता सुटेल आणि रात्री 11.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
मांडवी एक्सप्रेस – मडगाववरून सकाळी 8.30 वाजता सुटेल आणि रात्री 9.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
मडगाव LTT एक्सप्रेस – मडगाववरून सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि रात्री 11.35 वाजता LTT ला पोहचेल.
तेजस एक्सप्रेस – मडगाववरून दुपारी 12.50 वाजता सुटेल आणि रात्री 12.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव गाड्यांचे नवे वेळापत्रक

कोकणकन्या एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 11 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.40 वाजता मडगावला पोहचेल.
वंदेभारत एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 5.25 वाजता सुटेल आणि दुपारी 3.30 वाजता मडगावला पोहचेल.
जनशताब्दी एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 5.10 वाजता सुटेल आणि सायंकाळी 4.30 वाजता मडगावला पोहचेल.
मांडवी एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 7.10 वाजता सुटेल आणि रात्री 9.45 वाजता मडगावला पोहचेल.
मडगाव LTT एक्सप्रेस – LTT वरुन रात्री 12.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता मडगावला पोहचेल.
तेजस एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 5.50 वाजता सुटेल आणि सायंकाळी 5 वाजता मडगावला पोहचेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button