
आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ विधी,रत्नागिरी भाजपातर्फे आज विजयाचा जल्लोष
रत्नागिरी : सलग तिसऱ्या वेळा भाजप महायुतीचे सरकार केंद्रात आले असून आज रविवार दिनांक ९ जून रोजी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ विधी संपन्न होत आहे. यानिमित्त रत्नागिरी भाजपातर्फे जल्लोष विजयाचा या कार्यक्रमाचे आयोजन मारुती मंदिर येथे करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी 5 ते 7 ये वेळेत मारुती मंदिर, येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके, दक्षिण तालुकाध्यक्ष दादा दळी आणि उत्तर रत्नागिरी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांनी दिली.
हा क्षण आपल्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमानाचा व उत्साहाचा आहे. त्यामुळे सर्व शहर, तालुका एकत्र येऊन रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये नारायणराव राणे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी व आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी स्क्रीनवर पाहण्यासाठी सायंकाळी 5 वाजता मारुती मंदिर येथे उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यावेळी लाडू, मिठाई वाटप केले जाणार आहे, फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com