
कामथे रुग्णालयात बेडची कमतरता असल्याचा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा आरोप
चिपळूण तालुक्यातील कामथे येथील ओव्हिड रुग्णालयात बेडची कमतरता असून काल आठ ते दहा रुग्णांना बेड उपलब्ध झाले नाहीत आमदार खासदार व पालकमंत्र्यांनी चिपळूणच्या आरोग्य व्यवस्थेकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे गंभीर परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील वेळेअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला सर्वस्वी आरोग्य विभाग जबाबदार असेल असे यादव यांनी सांगितले आरोग्य यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करताना यादव यांनी रुग्णांना कुठे बेड उपलब्ध आहेत याची साधी माहितीही मिळत नसल्याचा आरोप केला आहे
www.konkantoday.com