वॉटरपार्क करण्यासाठी मागवलेल्या साहित्यात फसवणूक चिपळूणच्या हॉटेल व्यावसायिकाला १४ लाखांचा गंडा


चिपळूण येथील हॉटेल व्यावसायिकाची वॉटरपार्क करण्यासाठी मागवलेल्या साहित्यात १३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी एम. एस ट्रेन्ड वॉटर यागडस प्रा. लिमिटेड या वसई-मुंबईतील कंपनीच्या मालकिणीसह व्यवस्थापकीय संचालकावर बुधवारी गुन्हा दाखल झाला. हा फसवणुकीचा गुन्हा रेहेळ-भागाडी येथील वृक्षवल्ली रिसॉर्ट येथे ५ जानेवारी ते ५ जून २०२४ या कालावधीत घडला. याची फिर्याद विजय धनंजर जठार (६०, एफ-४ प्रणव प्लाझा, ओझरवाडी) यांनी दिली असून रेश्मा गोरे, सचिन उतेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार जठार यांनी एम. एस. ट्रेन्ड वॉटर रायगडस प्रा. लिमिटेड या वसई-मुंबईतील कंपनीच्या मालकीण रेश्मा गोरे व व्यवस्थापकीय संचालक सचिन सुदाम उतेकर यांना वॉटरपार्क बनवण्यासाठी लागणारे सामान व त्यामध्ये वॉटर राईटस इन्स्टॉलेशन तसेच त्यासाठी लागणार्‍या वस्तूंसाठी दोघांमध्ये ठरलेल्या करारानुसार रोख रक्कम तसेच धनादेश स्वरूपात १३ लाख ८० हजार रुपये अदा केले. असे  असताना जठार यांच्या प्रोजेक्टरच्या ठिकाणी उतरवण्यात आलेल्या वस्तूंचे वर्णन, लांबीत दिशाभूल करून अफरातफर करत जठार यांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे या दोघांवर भादंवि कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button