वरिष्ठ गट राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत रामेश्‍वर महाडीकला डेकॅथलॉनमध्ये कांस्य


वरिष्ठ गट राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या रामेश्‍वर महाडीकने डेकथलॉन क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले. वरिष्ठ गटात डेकथलॉनमध्ये पदक मिळवणारा तो कोकणातील पहिला खेळाडू ठरला आहे.
१ ते ३ जून या कालावधीत नागपूर येथे वरिष्ठ गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा संप्न झाली. दहा क्रीडा प्रकारात रामेश्‍वरने ५२१६ गुण मिळवत तिसर्‍या क्रमांकासह कांस्य पदक पटकावले.
मुंबईचा अनुपकुमार सरोज (५७४७) प्रथम तर सोलापूरचा प्रशांत लष्करने (५६७०) गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला.
१०० मीटर, ४०० मीटर, १५०० मीटर, ११० मीटर हर्डल्स, लांबउडी, उंचउडी, पोलवॉल्ट, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे दहा क्रीडा प्रकारांचा डेकॅथलॉनमध्ये समावेश असतो. या सर्व क्रीडा प्रकारात रामेश्‍वर महाडीकने पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान कायम राखले होते.
डेरवण कीडा संकुल येथे रामेश्‍वर सराव करीत असतो. त्याला प्रशिक्षक अविनाश पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रामेश्‍वरचा या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळा कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button