रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज निधन
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे असून अनेक दिवसांपासून आजारी होते. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.रामोजी राव हे एक यशस्वी उद्योजक, चित्रपट निर्माते होते. ते तेलुगू मीडियातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जातात. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होतं. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त रामोजी राव यांनी हैदराबादमध्ये रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. या समूहात जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क आणि चित्रपट निर्मिती कंपनी उषा किरण मुव्हीज यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com