
चिपळूण शहरातील रस्त्यांची वाताहात चिपळूणची जलवाहिनी रस्त्यांच्या मुळावर
लाखो करोडो रुपये खर्च करून तयार केलेले चिपळूण शहरातील काही रस्त्यांची सध्या पुरती वाताहात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी चिपळूण नगर पालिकेची मुख्य जलवाहिनी त्याला कारणीभूत ठरत आहे. ही जलवाहिनी गळतीपुळे सध्या डोकेदुखीचा विषय बनली आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या कडेला, तर काही ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध जमिनीखालून जाणारी ही जलवाहिनी अलिकडच्या काही वर्षात सातत्याने फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. या पाईपलाईनची गळती काढण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून डांबरी रस्त्यावर खड्डे खणावे लागत असल्याने रस्त्यांचे देखील पुरते वाटोळे लागले आहे. त्यामुळे ही जुनी जलवाहिनी सध्या रस्त्यांच्या मुळावर उठल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. www.konkantoday.com