रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात अकरा हजार ५१६ मतदारांची नोटाला पसंती
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जिल्ह्यातील ११ हजार ५१६ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. मतदानाचा हक्क बजावत असताना अशाप्रकारे आपली नाराजी व्यक्त करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
यामध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी नोटाचा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे.
दिवसेंदिवस राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकिट देण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे मतदाराला मतदानाचा हक्क बजावताना कोणताही दबाव येवू नये यासाठी अनेकवेळा नोटाचा पर्याय वापरात येतो. तसेच अनेकवेळा राजकारणावर विश्वास नाही म्हणून मतदान करण्यापेक्षा आपली असहमती दर्शविण्यासाठी आता नोटाचा पर्याय प्रभावी ठरत आहे. www.konkantoday.com