
मनोज जरांगे- पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आजपासून उपोषण सुरू
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे उपोषणावर ठाम आहेत. अंतरवाली सराटी येथे सभा घेण्यास पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. मात्र, जरांगे अंतरवाली सराटी येथे आजपासून उपोषण सुरू करणार आहेत.सगे-सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी जरांगे आजपासून उपोषण सुरू करतील.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे शनिवारी 8 जून पासून सुरु होणाऱ्या आमरण उपोषणाला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षण करिता या ठिकाणी आठ महिन्या पासून आंदोलन, उपोषण करत आहेत. याआधीही जरांगे यांनी उपोषण केले आहे.
www.konkantoday.com