नीट-यूजीत देण्यात आलेले ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी
यूजी परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी व त्याची सीबीआयकडून चौकशी करण्याकरिता पंतप्रधान कार्यालयाला आणि नॅशनल मेडिकल कमिशनला (एनएमसी) पत्र लिहिणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देखील सीबीआय चौकशीची मागणी करुन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) केली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशेच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन नीट-यूजीत देण्यात आलेले ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी केली. त्यावर विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
www.konkanyoday.com