अधीक्षक डाकघर विभागीय कार्यालयामार्फत 13 जून रोजी रत्नागिरीत जिल्हास्तरीय पेंशन अदालत
*रत्नागिरी, : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालयामार्फत 13 जून रोजी सकाळी 11 वा. विभागीय डाक कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पेंशन अदालत आयोजित करण्यात आली असल्याचे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आहे.
सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल, त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटारा झालेले नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
आपला अर्ज एन टी कुरळपकर, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी 415612 यांच्या नावे दिनांक 10 जूनपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. दिनांक 10 जून नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
www.konkantoday.com