
वीज ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा म्हणून महावितरणची खबरदारी
येणार्या पावसाळ्यामध्ये वीज ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार महावितरण कंपनीकडून रत्नागिरी जिल्ह्यात खबरदारी घेण्यात आली आहे. मार्गदर्शक सुचनेनुसार पावसाळ्यात वीजपुरवठ्यातील बिघाड कमीत कमी होईल या दृष्टीने नियोजन करून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीच्या कामांबरोबरच २३० खराब वा गंजलेले वीज खांब बदलण्याची कामे जिल्ह्यात करण्यात आली आहेत.
महावितरणकडून प्राधान्यक्रमानुसार वीज वाहिन्यांची व वीज उपकरणांची देखभाल व दुरूस्तीची कामे करण्यात आली आहेत. रस्त्यालगतच्या व रस्ता क्रॉस करणार्या वाहिन्यांच्या गार्डींगची तपासणी करणे व त्याचा योग्य तो ताण ठेवणे, उच्चदाब व लघुदाब खांबाचे पूर्ण अर्थिंग तपासणे तसेच आवश्यक असल्यास दुरूस्ती करणे, वितरण रोहित्रांचे पूर्ण अर्थिंग तपासणे आणि तुटलेल्या अर्थवायर पूर्ववत करणे, रोहित वितरण पेटीची जळालेली केबल बदली करणे, रोहित्र वितरण पेटीस अर्थिंग करणे, रोहित्राच्या तेलाची गळती थांबविणे, रोहित्राच्या ब्रीदमधील सिलीका जेल बदली करणे.
www.konkantoday.com