वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांचे वर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्याना दाखविला कराटेचा हिसका


रत्नागिरी शहरातील पांढरा समुद्र येथे वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (वय 49) यांच्यावर वाळू चोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी फावडा घेत उपजिल्हाधिकारी गेडाम यांच्यावर चाल केली. मात्र उपजिल्हाधिकारी गेडाम या कराटे नॅशनल चॅम्पियन असल्याने त्यांनी हल्लेखोरांनाच पाणी पाजले. शुक्रवारी सकाळी पांढरा समुद्र येथे ही घटना घडली. वाळू माफियांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे वाळू चोरीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे. श्रीमती गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत. गेडाम यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button