रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सात उमेदवारांनी आपल्या अनामत रक्कमा गमावल्या
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सातही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ४,४८,५१४, मावळते खासदार विनायक राऊत यांना ४,००,६५६ मते मिळाली असून उर्वरित ७ उमेदवारांना आपले डिपॉझीट गमवावे लागले आहे. राजेंद्र लहू आयरे यांना ७८५६, अशोक गंगाराम पवार यांना ५२८०, मारूती जोशी यांना १००३९, सुरेश गोविंदराव शिंदे यांना २२४७, अमृत अनंत तांबडे यांना ५५८२, विनायक लहू राऊत यांना १५८२६, शकील सावंत यांना ६३९५ मते मिळाली आहेत. या सर्वांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.