रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात लोकसभा निवडणूक जिंकल्याने भाजपचा कॉन्फिडन्स वाढला, मित्र पक्षांच्या आमदारानी काम न केल्याचा भाजपा कडून आरोप
(सुदेश शेट्ये) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नारायण राणे हे विजयी झाले त्यानी गेली दोन टर्म खासदार असलेल्या विनायक राऊत यांचा पराभव केला मात्र निवडणूक आटोपताच भाजपचे सहकारी पक्ष असलेल्या शिंदे शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवरच निवडणुकीत काम न केल्याचा आरोप राणे यांच्या मुलांकडून पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली आहे नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगतानाच राणे यांचे दुसरे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्या असलेल्या रत्नागिरी मतदार संघावर भाजपचा दावा केला आहे यामुळे निवडणूक आटोपताच भाजपने थेट मित्र पक्षावर आरोप सुरू केल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे मुळात रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक होते परंतु या ठिकाणी भाजपने शक्ती पणाला लावून ही जागा आपल्याकडे घेतली व जिंकूनही दाखवली यामुळे किरण सामंत यांची नाराजी कायम होती मधून मधून ट्विटर वरील त्यांच्या पोस्टमुळे हे नाराजी कायम दिसून येत होती त्यामुळे या मतदार संघात भाजपाला त्यांची मदत झाली की नाही याबाबत राणे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे याशिवाय या निवडणुकीच्या काळात किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची भेट घेतल्याचा आरोपही त्यांनी केला तसे आपल्याकडे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले आहे किरण सामंत यांच्यानंतर थेट पालकमंत्री उदय सामंत व संगमेश्वर चिपळूणचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनी सुद्धा निवडणुकीत योग्य प्रकारे काम केले नसल्याचा आरोप राणे कुटुंबीयांकडून केला जात आहे याला कारण देताना रत्नागिरी व चिपळूण मतदार संघात राणे यांना मताधिक्य न मिळता विरोधी उमेदवार राऊत यांना मताधिक्य मिळाल्याचे राणे यांचे म्हणणे आहे देशात यावेळी परिस्थिती वेगळी होती खुद्द पंतप्रधान मोदींच्या मुस्लिम समाजाबाबत काही वक्तव्यामुळे मुस्लिम मतदार नाराज होता मोदी व भाजपा मुस्लिम मतदारांच्या विरोधात कसा आहे हे पटवण्यात विरोधकांना यश आले होते त्यातच मुस्लिम मतदारांना मतदान करण्यासाठी फतवे काढले गेल्याचे सांगण्यात आले याचाच परिणाम रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबईत मुस्लिम मतदारांकडून शिवसेनेच्या उबाठा गटाला मोठ्या प्रमाणावर एक गठ्ठा मतदान झाले होते रत्नागिरी व चिपळूण मतदार संघाचा विचार करता या ठिकाणी मुस्लिम मतदारांची मोठी संख्या आहे यावेळी या समाजाने एक गठ्ठा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला व तो अमलातही आणला कारण त्याच्या भागातील मतदार केंद्रावर या मतदारानी केलेली गर्दी पाहता व आकड्यांवरून हे सिद्ध झाले आहे यावेळी भाजपाच्या कोणत्याही प्रचार सभेत मुस्लिम मतदार यांची उपस्थिती दिसली नाही मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेपासून अनेक सभात मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होता मुस्लिम मतदाराने यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचे ठरवले असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले शकील सावंत यांना देखील मुस्लिम मतदारांकडून मतदान झाले नाही त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले याशिवाय संविधानाबाबतही विरोधक भाजप विरोधी प्रचार करण्यात यशस्वी झाल्याने त्याचाही फटका भाजपला बसला नारायण राणे यांच्या दृष्टीने विचार करता सिंधुदुर्गातील मतदारानी त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणावर हात दिला इतके वर्षांच्या राणे यांच्या तेथील विकास कामांमुळे व यावेळी स्वतः नारायण राणे उभे राहिल्याने सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यातील मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे नारायण राणे यांना विजय मिळवता आला याला आणखी एक कारण म्हणजे या सर्व मतदार संघात मुस्लिम मतदारांची संख्या अत्यंत अल्प होती त्यामुळे सिंधुदुर्ग तेवढा परिणाम झाला नाही यावेळी मुस्लिम मतदारांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय ठाम घेतल्याने याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार असे स्पष्ट दिसत होते परंतु त्या मानाने रत्नागिरी व चिपळूण मतदार संघात फार मोठ्या फरकाची आघाडी राऊत यांना मिळाली नाही जर राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे सामंत यांनी व निकम यांनी काम केले नसेल तर रत्नागिरी व चिपळूण मतदार संघात विनायक राऊत यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्याची आघाडी मिळणे आवश्यक होते परंतु तसे तेथे झालेले दिसत नाही या लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपने जोर केला होता खुद्द राणे कुटुंबीयांच्या बरोबरच मंत्री रवींद्र चव्हाण माजी आमदार प्रमोद जठार रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने आदींनी जोर लावला होता हे खरे आहे याशिवाय मोदींची सहानभूती असलेला काही मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर आला मात्र त्यांचे व भाजपची एवढी मोठी ताकद नाही की पहिल्यापासून शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या रत्नागिरी मतदारसंघात मताधिक्य रोखून ठेवता येईल निष्ठावान शिवसेना कार्यकर्ते व त्यातच उबाठा शिवसेनेला मिळालेला मुस्लिम मतदारांचा पाठिंबा यामुळे आपण सहज निवडणूक जिंकून येऊ असा आत्मविश्वास राऊत यांना होता त्यामुळे रत्नागिरी व
संगमेश्वर चिपळूण आदी भागातून मतदान झाले परंतु त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही आता हे मताधिक्य कोणामुळे मिळाले नाही याचा अभ्यास होणे गरजेचे आहे एकूणच लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे जिल्ह्यातील भाजपमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास आला आहे त्याचाच एक भाग म्हणून दबाव तंत्र वापरून रत्नागिरी व राजापूर मतदार संघात आपला दावा भाजपा करत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे