
रत्नागिरी शहरात कुवारबांव येथे मिठाई व्यावसायिकाला ११ लाखांचा गंडा
रत्नागिरी शहरात कुवारबांव येथे मिठाई व्यावसायिकाला ११ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. शहरानजिकच्या कुवारबांव येथील एक मिठाई व्यावसायिक इन्स्टाग्रामवरील लोन मिळवण्याच्या जाहिरातीला भुलून ऑनलाईन फसवणुकीचा बळी ठरला. त्या व्यावसायिकाची ११ लाख ६० हजार ६७४ रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com