
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-लोटेनजिक अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील नाटे औद्योगिक वसाहतीतील एक्सल फाटा ते पिरलोटेनजिक अज्ञात अवजड वाहन डोक्यावरून गेल्याने राकेश रमेश माने (२७, रा. गुणदे-तलारीवाडी) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात अवजड वाहनचालकाने तातडीने अपघातस्थळावरून पलायन केल्याने या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश माने हा दुचाकीने (एम.एच.०८ /ए एक्स २८८४) एक्सल फाटा बाजूने पिरलोटेनजिक जात असताना पाठिमागून भरधाव येणार्या अवजड वाहनाने धडक दिली. यावेळी दुचाकीसह रस्त्यावर पडल्यानंतर अवजड वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. www.konkantoday.com