
फिनोलेक्स ऍकॅडमीने पटकावला कोकणातील अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मान
टाइम्स ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या टाइम्स इंजिनिअरिंग रँकिंग २०२४ सर्वेक्षणात फिनोलेक्स ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने संपूर्ण भारतामधील १७५ उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १३१ वे स्थान पटकावले आहे. ऍकॅडमीने महाराष्ट्रात २१ वे, मुंबई विद्यापीठात १८ वे स्थान पटकावले असून कोकण विभागात अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मान पुन्हा मिळवला आहे.