चिपळूण नगरपालिकेने घराघरात वाटली माहिती पत्रके, नैसर्गिक आपत्तीत सहज साधता येणार प्रशासनाशी संपर्क
चिपळूण शहर व परिसरात पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती उदभवल्यास आता प्रत्येक कुटुंबाला मदतीसाठी प्रशासनाशी सहज संपर्क साधता येणार आहे. चिपळूण नगर पालिकेने मदत कार्यातील अधिकारी, कर्मचार्यांचे दूरध्वनी क्रमांक असलेले माहिती पत्रक घरोघरी वाटप करण्यास सुरूवात केली आहे. हे पत्रक सहज दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.