खेड-समर्थनगरमध्ये नव्या डंपिंग ग्राऊंडची निर्मिती, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
खेड शहरातून दिवसाकाठी गोळा होणार्या कचर्याची समर्थनगर येथे प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे. यामुळे धुमसणार्या कचर्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम असतानाच येथे नव्या डंपिंग ग्राऊंडची निर्मिती झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. समर्थनगर येथे रस्त्यालगत ट्रॅक्टरद्वारे इमारतीमधील चिखल व कचरा आणून टाकला जात असल्याने रहिवासी पुन्हा आक्र्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. खेड शहरातून जमा होणार्या कचर्याची विल्हेवाट लावताना नगर प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.