खेड भरणे जाधववाडी नजीक बिबट्या वाघाची नखे विक्रीसाठी घेऊन आलेल्या ३ संशयितांना चिपळूण वनविभागाकडून मुद्देमालासह ताब्यात
मुंबई – गोवा महामार्गावरील खेड भरणे जाधववाडी नजीक बिबट्या वाघाची नखे विक्रीसाठी घेऊन आलेल्या ३ संशयितांना चिपळूण वनविभागाकडून मुद्देमालासह ५ जून रोजी ताब्यात घेतले. तर गुरुवारी केलेल्या कारवाईत एकाला बिबट्या वाघाच्या नखासह ताब्यात घेण्यात आले आहे. संरक्षित असलेल्या बिबट्या वाघाची नखे थेट विक्रीसाठी आणल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ५ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भरणे ता. खेड गावच्या हद्दीत मुंबई – गोवा महामार्गावर स्थानिक ठिकाण जाधववाडी इते बिबट्या या वन्यप्राण्याची नखे विक्रीसाठी अज्ञात व्यक्ती रिक्षामधून घेऊन येणार असलेची माहिती मिळाली होती.इथे सापळा रचून तीन संशयित दिलीप सावळेराम कडलग वय – ४८ रा. घाटकोपर, मुंबई, अतुल विनोद दांडेकर, वय ३६ रा. चेंबुर, मुंबई, विनोद पांडुरंग कदम वय ४२ रा. सावर्डे ता. चिपळूण यांच्या ताब्यातील रिक्षा क्र. एम एच ०३ बी ए ९७१२ मधून संशयितरित्या फिरत असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून बिबट्याची एकूण ४ नखे आणि रिक्षा हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com