
पॅरिस मध्ये भारतीय स्टार रेसलर विनेश फोगाटची प्रकृती अचानक बिघडली, तात्काळ रूग्णालयात भरती
पॅरिस मध्ये भारतीय स्टार रेसलर विनेश फोगाटची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे तीला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलसाठी अपात्र ठरल्याची बातमी आल्यानंतर ही दुसरी बातमी समाेर आली आहे.पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये काल (मंगळवार) विनेश फोगाटने एका पाठोपाठ एक या प्रमाणे तीन सामने जिंकले आणि थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. यामुळे संपूर्ण भारतभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अंतिम सामन्यात पोहोचल्याचा अर्थ होता की, भारत आणि विनेश फोगाटला पदक पक्के झाले होते.आता आज (बुधवार) फक्त हे पदक गोल्ड असणार की सिल्व्हर इतकेच ठरणे बाकी होते. आज रात्री 12.45 च्या सुमारास विनेश फोगटचा अंतिम सामना होणार होता. मात्र त्याआधी तीचे वजन केले असता हे वजन थोडे जास्त असल्याचे दिसून आले. यानंतर ती या सामन्यातून बाहेर पडली. फाेगाटला पुढील सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले.दरम्यान, या इव्हेंटमधून तिला अपात्र घोषित करताच विनेश फोगटला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीला निर्जलीकरणामुळे रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समाेर येत आहे.