अजितदादा म्हणतील तीच पूर्व दिशा…मी आजही आणि उद्याही त्याच्या सोबतच- आमदार शेखर निकम
चिपळूण –
अजितदादा म्हणतील तीच पूर्व दिशा…मी आजही आणि उद्याही त्याच्या सोबतच कायम असणार आहे त्यामुळे पक्ष बदलण्याचा प्रश्नच नाही असा स्पष्ठ खुलासा आ शेखर निकम यांनी केला आहे
।।शरद पवार गटात जाणार।।
एका वृत्त वहिनीने वृत्त प्रसिद्ध करताना शेखर निकम शरद पवार यांच्या गटात परतणार आहेत राजकारणात काहीही घडू शकते असा दाखला ही आ निकम यांनी दिल्याचे म्हटले आहे मात्र या साऱ्याचा स्पष्ठ शब्दात इन्कार करीत आपण ना अजितदादा याच्या सोबत आहोत आणि अखेर पर्यंत राहणार असल्याचे ठामपणे स्पष्ठ केले
।। हो आहेत संबंध।।
आदरणीय शरद पवार कुटूंब आणि आमचे संबंध आजचे नाहीत माझ्या वडिलांपासून हा स्नेह आहे शिवाय आम्ही काम करीत असल्याने अनेक नेत्याजवल ही संबंध आहेत अनेक वर्षाचे संबंध कधी तुटत नसतात असे या निकम यांनी यावेळी स्पष्ट केले
।।राजकारणात कधीही काही घडू शकते।।
राजकारणाच्या विषयी झालेल्या चर्चेत आपण राजकारणात कधीही काहीही घडू शकते असे म्हटले होते मात्र ते पक्ष बदलणार आहे असे होत नाही असा सवाल आ निकम यांनी यावेळी केला आहे माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून उठवलेली ही आवई असल्याचे ते म्हणाले
।। …तीच पूर्व दिशा।।
ना अजितदादा सोबत आहे आणि यापुढेही मी राहणार आहे दादा म्हणतील तीच पूर्व दिशा माझ्यासाठी असणार आहे माझ्यासाठी दादा महत्वाचे आहेत असे आ निकम यांनी सांगितले
।। का पक्ष बदलू।।
मी पक्ष का बदलू ? एकोणीस हजाराचे मताधिक्य विरोधी उमेदवारांना मिळाले म्हणून? अजिबात बदलणार नाही प्रत्येक निवडणुकीची बेरजेची गणिते वेगळी असतात आणि सत्तावन्न हजाराचे मताधिक्य तोडून आपण आमदार झालो आहोत त्या मुळे एकोणीस हजाराची चिंता नाही
।। माझा माझ्यावर विश्वास।।
मुळात लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार वेगवेगळ्या पद्धतीने झाला होता प्रचंड गैरसमज पसरवून समाजसमाजात वेगळे वातावरण केले गेले होते मात्र माझी स्वतःची गणिते वेगळी आहेत त्यामुळे पन्नास हजाराच्या पुढे मताधिक्य घेऊन विजयी होणार असा विश्वास आहे असे ही आ निकम यांनी स्पष्ठ केले
www.konkantoday.com