*नीट परीक्षेत महाराष्ट्राचा वेद सुनीलकुमार शेंडे ‘अव्वल’ ; देशातील 67 जणांना मिळाली पहिली रँक
वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱया नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने 4 जून रोजी निकाल जाहीर केला, परंतु 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याने या निकालाकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही.या वर्षी नीट यूजीमध्ये एकूण 67 विद्यार्थ्यांनी एअर वन रँक मिळवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना 720 गुण आणि 99.99 पर्सेंटाईल मिळाले आहेत. तसेच 13.16 लाख मुलांनी नीटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जनरल पॅटेगरीतून महाराष्ट्राचा वेद सुनीलकुमार शेंडे हा विद्यार्थी टॉपवर आहे. दुसऱया नंबरवर तामीळनाडूचा सैयद आरिफिन युसूफ एम, तिसऱया नंबरवर दिल्लीचा मृदुल मान्या आनंद आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने नीट निकालाची सूचना ‘एक्स’वर दिली. या वर्षी जवळपास 24 लाख मुलांनी नीटची परीक्षा दिली होती.नीटची परीक्षा 5 मे रोजी देशातील 557 शहरांत आणि 14 राज्यांत घेण्यात आली होती. 24 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एकूण 9लाख 96 हजार 393 मुले तर 13 लाख 31 हजार 321 मुलींचा यात समावेश होता.*पहिल्या रँकमधील टॉप 10 विद्यार्थी*वेद सुनीलकुमार शेंडेसैयद आरिफिन युसूफ एममृदुल मान्या आनंदआयुष नौगरैयामजिन मन्सूररूपायन मंडलअक्षत पंगरियाशौर्य गोयलतथागत अवतारचाँद मलिक*14 मुलींना पहिली रँक*या वर्षी नीट परीक्षेत एकूण 14 मुलींनी नीट परीक्षेत पहिली रँक मिळवली आहे, तर 53 मुलांनी पहिली रँक मिळवली आहे.www.konkantoday.com