अनेक महिलांनी प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने वचन दिलेल्या ‘गॅरंटी कार्ड्स’ची मागणी करत काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा लावल्या
इंडीया आघाडीच्या वचननाम्याबद्दल नवी माहिती समोर आली आहे. इंडीया आघाडीला विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये चांगले यश मिळाले आहे. यामुळे लखनऊमधील अनेक महिलांनी प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने वचन दिलेल्या ‘गॅरंटी कार्ड्स’ची मागणी करत काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा लावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेस पक्ष तीन अंकी आकडाही गाठू शकला नसला तरी निवडणुकीत राहुल गांधींनी मालमत्ता वाटपासह अनेक मोठी आश्वासने दिली होती. आता उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर मुस्लीम महिलांची मोठी रांग लागली आहे. हे सर्वजण एक लाख रुपयांची मागणी करत असून, त्यांना आर्थिक लाभ द्या, असेही त्या सांगत आहेत.काँग्रेसच्या आश्वासनानंतर आता मुस्लिम महिला आपली ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे घेऊन पक्ष कार्यालयात पोहोचल्या आहेत. या महिलांच्या हातात काँग्रेसचे ‘गॅरंटी कार्ड’ही आहे, ज्यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाला एक लाख रुपयांच्या पगाराव्यतिरिक्त कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले आहे. या हमीपत्रात कर्जमाफीचे आश्वासनही काँग्रेसकडून देण्यात आले आहे.www.konkantoday.com