सिंधुदुर्गातील इच्छूक व्यावसायिकांची आरजू टेक्सोलकडून २ कोटींची फसवणूक
रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो, अशी जाहिरात प्रसिद्ध करुन व्यवसाय करण्यासाठी कच्चा माल देवून पक्क्या मालाची विक्री करण्याची ग्वाही देत सिंधुदुर्गातील इच्छूक व्यावसायिकांना दोन कोटी १५ लाख ९ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी रत्नागिरी येथील आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चार संचालकांसह सातजणांवर फसवणुकीचा गुन्हा कुडाळ पोलीस ठाण्यात रविवारी उशीरा दाखल झाला आहे.राजश्री रघुनाथ साधले (सध्या रा. कसाल, मूळ रा. वाडीवरवडे-कुडाळ) यांच्यासह एकूण १३९ जणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास कुडाळ पोलीस करीत असून अधिक तपासासाठी हा गन्हा आर्थिक गुन्हा शाखा (ओरोस) यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.www.konkantoday.com