शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीतील चोरटे झारखंडमधील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखांच्या बंपर चोरीमधील चोरटे झारखंडमधील निघाले आहेत. गुहागर पोलिसांनी गेले २० दिवस केलेल्या तपासामध्ये चाोरट्यांचा पत्ता मिळवला. मात्र चोरटे हाती लागले नाहीत. परंतु त्यांना सहकार्य करणारा व त्यामध्ये सहभागी असलेला संशयित म्हणून त्याच्या भावाला गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिली.तालुक्यातील शृंगारतळीमधील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखांचे मोबाईल व ९० हजारांची रोकड चोरी गुहागर पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. www.konkantoday.com