शिवप्रतिमा खरेदीचा पंचायत समितीचा प्रस्ताव धुडकावल्याने लाखो रुपयांची बचत
३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शासकीय कार्यालयात लावली जाणारी शिव स्वराज्य प्रतिमा व बोधचिन्ह चिपळूण बाजारपेठेत कमी दरात उपलब्ध असतानाही ती ठराविक एजन्सीमार्फत घ्या, त्यासाठी चार हजारांचा धनादेश तत्काळ काढा, अशा प्रकारचे पंचायत समितीस्तरावरून काढले गेलेले फर्मान सरपंच संघटनेच्या आक्षेपानंतर ग्रामपंचायतींनी स्वतःच खरेदी केलेल्या या प्रतिमांमुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे चार लाख वाचले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के यांनी दिली.www.konkantoday.com