
माजी डीवायएसपी व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी सुभाषचंद्र डांगे यांचे दुःखद निधन
माजी डीवायएसपी सुभाषचंद्र डांगे यांचे काल अकस्मित दु खद निधन झाले सुभाषचंद्र डांगे यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून अतिशय कार्यक्षमपणे काम पाहिले होते रत्नागिरी पोलीस स्थानकातही त्यांनी पोलिस निरीक्षक म्हणून अत्यंत कर्तव्यदक्ष पणे काम केले होते ८६ ते९१ या काळात रत्नागिरीत काम करीत असताना त्यांची कारकीर्द लक्षणीय व वादळी ठरली होती केवळ पोलिस अधिकारी म्हणून नियमांची अंमलबजावणी न करता त्यांनी अनेक सामान्य लोकांना न्याय मिळवून दिला होता तसेच गुन्हेगारी जगतात त्यांच्या नावाचा एक प्रकारे दरारा होता गुन्हेगारांना समोर जाऊन भिडणे हा त्यांचा स्वभाव होता त्यामुळे त्यांच्या काळात गुन्हेगारांवर वचक व कायद्याची दहशत निर्माण झाली हाेती
रत्नागिरीचे त्यांचे विशेष आपुलकीचे नाते होते रत्नागिरीत असताना त्यांनी अनेक राजकीय पक्षांपासून सामान्य लोकांपर्यंत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होती पोलिस खात्यात ते डीवायएसपी म्हणून निवृत्त झाले त्यानंतर ते पुणे येथे स्थायिक झाले निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात झोकून दिले होते विशेषत वनराई व वृक्ष जगवा या विषयात ते मोठ्या प्रमाणावर काम करीत होते मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई येथे त्यांचे मूळ गाव आहे त्या ठिकाणी व पुणे येथे त्यांचे सामाजिक काम सुरूच होते मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व्हावी म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत मोफत वृक्ष रोपांचे वाटप कार्यक्रमही केले होते निवृत्तीनंतरही त्यांचे रत्नागिरी वरील प्रेम कमी झाले नव्हते त्यामुळे ते अधूनमधून रत्नागिरीला भेट देत होते आज रत्नागिरीतही त्यांनी असंख्य मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार जपला आहे त्यांच्या या अचानक निधनामुळे सर्वांना धक्का बसला असून एका वादळी कारकिर्दीचा अंत झाला आहे पोलिस खात्यात असूनही कायदा व माणुसकी जपणारे एक व्यक्तिमत्त्व हरपले आहे आज पुणे कात्रज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांचे मागे त्यांची पत्नी ,दोन उच्चशिक्षित मुले ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे
wwwkonkantoday.com