जिल्हा इंडस्ट्रीज फेडरेशनच्या उद्योजकीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत १५ जूनपर्यंत

रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत उद्योजकांनी केलेल्या श्रमांचा, उद्योजकीय कौशल्याचा गौरव करणे, त्याचे अभिनंदन करणे, जिल्ह्याची अधिकाधिक औद्योगिक प्रगती व्हावी, म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज या संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट स्टार्ट पुरस्कार, रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार, सामाजिक जबाबदारी पुरस्कार, जागतिक उद्योजकीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांची मुदत ३० मेपर्यंत होती. परंतु ती आता १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत यांनी दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button