जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून खेडमध्ये २४ लाखाचा तरूणाला ऑनलाईन गंडा
खेड शहरातील एकविरा नगर येथे वास्तव्यास असलेल्या तरूणाची तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक न करता कंपनीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणाने पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशीरा अज्ञातावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत विक्रांत विजय दांडेकर (४०, रा. एकविरा नगर, खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १९ एप्रिल ते २४ मे या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. www.konkantoday.com