गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कोळसावाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात एकजण ठार

मुंबई गोवा महामार्गावर राजापूर गाडगीळवाडी येथील बस थांब्यानजीक गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कोळसावाहू ट्रकने या ठिकाणी उभ्या असलेल्या चार दुचाकी व क्वालीस गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात एकजण ठार झाला असून १० जण जखमी झाले आहेत. अपघातात ट्रक व क्वालीसह चार दुचाकींचे मौठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर ट्रक पलटी झाल्याने डीझेल टाकी फुटुन डीझेल व ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहतुक एका बाजुने वळविण्यात आली होती.उतारावरून वेगाने घसरत येणारा हा ट्रक पाहून अनेकांनी जीव वाजविण्यासाठी पळापळ केल्याने अनेकजण बालंबाल बचावले आहेत. या अपघाताची माहीती मिळताच राजापूर पोलीसांसह अनेकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली व तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.गोव्याकडू कोळसा भरून मुंबईकडे जाणारा हा चौदा चाकी मोठा ट्रक महामार्गावर गाडगिळवाडी येथील उतारावरून भरधाव वेगाने आला व हा अपघात झाला. यावेळी या ठिकाणी असलेल्या बसथांब्यावर काही प्रवाशी व काही दुचाकीस्वार आपल्या दुचाकी लावून थांबले होते. तर एक क्वालीस देखील उभी होती. भरधाव वेगात आलेल्या या ट्रकने तेथे उभ्या असलेल्या चार दुचाकींना व क्वालीसला जोरदार धडक दिली. यावेळी वेगाने ट्रक येत असल्याचे लक्षात येता तेथे उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांनी आपला जीव वाचविण्यासाठी पळापळ केली. मात्र यात या ठीकाणी उभ्या असलेल्या सुदेश चंद्रकांत फाटक यांना जोरदार धडक बसल्याने ते जागीच ठार झाले तर अन्य काही प्रवाशी जखमी झाले, पुढे या ट्रकनेक्वालीस गाडीला देखील जोरदार धडक दिल्याने या क्वालीस मधील चार जण गंभीर जखमी झाले.या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये क्वालीस गाडीतील विकास रघुनाथ पाडावे, रघुनाथ भगवान पाडावे, रामदास लक्ष्मण दळवी, श्रावणी रामदास दळवी सर्व रा. कणेरी यांचा समावेश आहे. तर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये मिहिर मिलींद धुळप (१३) रा. कोंढेतड याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या पाचही जणांवर राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.www.konkantoday.vom

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button