
खेडमध्ये नगर परिषदेच्या उद्यानात प्रौढाचा मृतदेह
खेड नगर परिषदेच्या कार्यालयासमोरील उद्यानात एका प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. हा मृत प्रौढ सातारा येथील रहिवासी असल्याचे समजते. येथील पोलिसांकडून त्याची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते. त्याने मद्यप्राशन केल्यानंतर तो उद्यानात निपचित पडला होता. ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर गर्दी केली. अखेर गृहरक्षकदलाचे संजय कडू यांनी १०८ रूग्णवाहिकेस संपर्क साधत पोलीस स्थानकातही खबर दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. www.konkantoday.com