
अलोरे शिरगाव येथे विनापरवाना ताडी-माडी विकणार्यावर गुन्हा
चोरट्या पद्धतीने ताडी-माडीचा व्यवसाय करण्यासाठी विनापरवाना केलेला साठा अलोरे-शिरगाव पोलिसांनी जप्त केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे रविवारी घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून तब्बल लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सुनील धोंडू शिंदे (६३) व शंकर गंगारराम ताम्हणकर (६१, दोघे-अलोरे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद जगन्नाथ दिनकर चव्हाण (४१, अलोरे-शिरगाव पोलीस स्थानक) यांनी दिली आहे.www.konkantoday.com